अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-आज दि 24 नोहेंबर मंगळवार रोजी इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन तर्फे अवैध उत्खनन तात्काळ थांबविण्यासाठी निवेदन चाळीसगाव शहरा लगतच खडकी बायपास येथील एमआयडीसी भागातील खदानीत मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे.
हे भूमाफिया प्रशासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचा प्रशासनाचा महसूल बुडवत आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार उत्खनन न करता मनमानी पद्धतीने मोठ्या यंत्राचा वापर करताहेत जेसीबी पोकलांड सारख्या यंत्रांचा वापर करून तसाच सुरुंग लावून अवैध पद्धतीने उत्खनन करीत आहेत या भागातून मुरूम डबर खडीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे ,यामुळे पर्यावरणाची ही हानी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे यापूर्वी याच संदर्भात तहसीलदारांकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत तसेच अनेक वृत्तवाहिन्यांनी वृत्तपत्रात बातम्या देखील प्रसिद्ध केल्या आहेत ,मात्र याबाबत कुठलीही दखल प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही असे चित्र दिसत आहे की शासन भूमाफिया समोर हातबल झाले आहे का?
होत असलेल्या अवैधरित्या उत्खननाबाबत प्रशासन कानाडोळा का करत आहे? होत असलेल्या उत्खनना कडे प्रशासन का फिरकत नाही असे अनेक प्रश्न उभे राहतात प्रशासनाने कठोर कारवाई करावी असे निवेदन चाळीसगाव इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन यांनी तहसीलदार यांना दिले आहे
यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया चे अध्यक्ष महेेंद्र सूर्यवंशी ,उपाध्यक्ष खेमचंद कुमावत, सचिव गफ्फार शेख ,सहसचिव आनंद गांगुर्डे, रोहित शिंदे, दीपक गढरी ,रणधीर जाधव ,राजेंद्र देवरे वैभव पवार ,शुभम पाटील आदी उपस्थित होते.