अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचा इशारा
सार्वजनिक ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे सर्व गावात अटीतटीची लढाई चालू आहे त्या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नारायण पवारयांनी ज्या गावात मतदान होणार आहे त्या गावांमध्ये जाऊन सर्व पोलिस कर्मचारी अधिकारी यांचे सोबत रूट मार्च केले असून तत्पूर्वी ग्रामपंचायत मध्ये जाऊन सर्वांची बैठक घेऊन सर्व उमेदवारांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार उपद्रवी गुन्हेगारांवर 107 ,144 प्रमाणे कारवाई केली तसेच आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल व गय केली जाणार नसल्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले आहे.