अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव-जन हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य सह संघटक पदी महेंद्र सूर्यवंशी यांची निवड,नियुक्तीचे पत्र जन हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ऍड राजपाल वडगे यांनी दिले असून या निवडीने सूर्यवंशी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
नियुक्ती पत्र देतांनी जन हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ऍड राजपाल वडगे यांनी सांगितले की निष्ठने व कर्तव्य भावनेने समाजातील विविध समस्या,गोर गरिबांचे कल्याण व भ्रष्ट्राचार निर्मूलना सारख्या पवित्र कामास हातभार लावावा.
तसेच यावेळी बोलतांना सूर्यवंशी यांनी मी जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी तत्पर राहणार असून समितीने माझ्यावर केलेल्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही तसेच समिती चे कार्य गावागावात पोहचवून समितीने दिलेल्या कार्यास तण, मन व धनाने करणार अशी गव्हाही नवनियुक्त जन हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य सह संघटक महेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.