अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दैनिक भास्करचे चाळीसगाव प्रतिनिधी सूर्यकांत कदम यांची देशभरातील पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशनच्या(नोंदणीकृत) जळगाव जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. असोसिएशनचे महराष्ट्र प्रभारी अजयकुमार मिश्रा यांनी नुकतीच ही नियुक्ती केली.नियुक्तीचे पत्र श्री. कदम यांना प्राप्त झाले.
देशातील विविध राज्यामध्ये आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचे जाळे पसरले असून विविध दैनिकात काम करणाऱ्या पत्रकारांचे संघटन करून देशपातळीवर एक प्रभावी संघटना म्हणून असोसिएशन पुढे आली आहे. संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार सुर्यकांत कदम यांची नियुक्ती महराष्ट्र प्रभारी अजकुमार मिश्रा यांनी आयडिया जर्नलिस्ट असो.चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.प्रमोद वाचस्पती व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रमोद झा (नवी दिल्ली) यांच्या आदेशाने केली.
आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशनच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सुर्यकांत कदम यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.