अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरातील नाल्यांची सफाई होत नसल्याने समाजसेवकांनी नाल्यांची स्वतः सफाई करण्यास सुरुवात केली नगरपरिषदेस जाग येत नाही जेसीबी मिळत नसल्याचे कारण सांगून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नगरपरिषदेस खेळण्याचे जे सी बी समाजसेवक विजय शर्मा यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने भेट दिले.
आज चाळीसगाव शहरातील समाजसेवक विजय शर्मा चाळीसगाव एस टी महामंडळात कार्यरत आहेत व त्यांचे सहकारी खुशाल पाटील हे दर रविवारी शहराची स्वच्छता करत असतात त्यांनी स्वतः नाल्यांची सफाई केली असून नगरपरिषदेस लवकरच पावसाळा सुरू होणार असून जेसीबी च्या साह्याने नाले सफाई लवकरात लवकर करावी जेणे करून लोकांना पावसाळ्यात आरोग्य संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार नाही मात्र जेसीबी मिळत नसल्याचे सांगत जनतेच्या आरोग्याशी खेळ होत आहे, यामुळे आज शर्मा यांनी वाढदिवसा निमित्ताने नगरपरिषद मुख्याधिकारी यांना खेळण्याचे जेसीबी देत पुन्हा नाले सफाई बद्दल विनंती केली असून यावेळी विजय शर्मा,खुशाल पाटील उपस्थित होते
या खेळण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा खेळ थांबणार का याकडे मात्र चाळीसगांवकरांचे लक्ष लागले आहे.