अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगांव(प्रतिनिधी)-चाळीसगाव शहरात रुग्ण संख्या जिल्ह्यातील रुग्णसंख्येपेक्षा जास्त शनिवार रविवार कडक लॉकडाऊन ची उपविभागीय दंडाधिकारी लक्ष्मण सताळकर यांची व्यापारी वर्गाशी चर्चा
उपविभागीय दंडाधिकारी लक्ष्मण सताळकर यांनी लोकप्रतिनिधी ,महसूल प्रशासन,पोलीस प्रशासन,नगरपालिका प्रशासन,व्यापारी वर्ग यांना सर्वांना घेऊन चर्चा करत ,कोरोनाचा प्रदर्भाव जिल्ह्यात कमी होत असतांना चाळीसगाव तालुक्यात प्रादुर्भाव वाढत असून सर्वांनी सोबत येऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सहकार्य करावे तसेच दि 5 जून शनिवार ते 6 जून रविवार या दोन दिवशी फक्त शासकीय कार्यालय,मेडिकल व दूध विक्री केंद्र वगळता इतर आस्थापने बंद राहतील तरी सर्व व्यावसायिक व नागरिकांनी याची नोंद घेत सहकार्य करावे असे आव्हान उपविभागीय दंडाधिकारी लक्ष्मण सताळकर यांनी केले आहे.