अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात सामाजिक कार्यकर्त्यांनी खेळण्याचे जेसीबी दिल्या नंतर नगरपरीषदे तर्फे दुसऱ्या दिवसापासून जोरदार सफाई अभियान सुरू झाले नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला मात्र गाजावाजा करत सुरू झालेले अभियान पूर्ण झाले का? की जेसीबी द्वारे सफाई फक्त नावाला झाल्याची चर्चा परिसरात आहे
शहरातील नगरपालिका मंगल कार्यालयाजवळील नाल्याची सफाई झाली, मात्र नावालाच नाला पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला नसून फक्त देखावा करण्यात आला आहे, नाला स्वच्छता करतांना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तुटल्याची नागरिकांची तक्रार असून अशुद्ध पाणी पुरवठा झाल्याचे नागरिकांनी म्हटले आहे,नाल्यात तुडुंब गाळ, घाण साचलेले असून पावसाळ्यात सुरवात झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही,नगरसेवकांनी बघ्याची भूमिका घेतली असून नागरिकांचा अंत न पाहता त्यांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे अशी लोकांची अपेक्षा असून लोकांना “हम थे जिनके सहारे,वो हुए ना हमारे” अशी म्हणण्याची वेळ आली आहे.