अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगांव (प्रतिनिधी) : चाळीसगाव धनगर समाज सेवा संस्था महाराष्ट्र राज्य शहर युवक अध्यक्षपदी ऋषिकेश (आप्पा) मोहन देवरे यांची निवड महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्तात्रय चोरमल यांच्या पत्राद्वारे, नवनाथ ढगे प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशाने निवड करण्यात आली आहे. तसे नियुक्तीचे पत्र आज दिनांक 02/07/2021 रोजी धनगर समाज सेवा संस्था महाराष्ट्र राज्य पदाधिकारी दिपक आगोणे यांच्या हस्ते ऋषिकेश (आप्पा) देवरे यांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्तात्रय चोरमले यांनी निवडीचे पत्र देत असताना फोन वर शुभेच्छा देत म्हणाले की सर्व धनगर समाज बांधवांना संघटित करून त्यांच्या मूलभूत गरजा न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी आपण पाठपुरवठा करावा तसेच शिक्षण, आरोग्य, घरकुल अशा महत्त्वाच्या मूलभूत गरजांसाठी समाजाला संघटित करा. समाजावर अन्याय करणाऱ्यांना आपल्या सहकार्याने धडा शिकवु असे बोलताना म्हणाले तसेच निवडीनंतर देवरे यांनी आपल्याला मिळलेल्या जबाबदारी चे पालन करत तळागाळातील समाज बांधवांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून सोडविण्यासाठी नेहमी सज्ज असेल असे सांगितले.