संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संघटनेने महाराष्ट्र, गोवा व गुजरात प्रभारी प्रदेश अध्यक्ष पदाची जी जबाबदारी दिली आहे,तिला सार्थ ठरवत संघटन बांधणी करत पत्रकारांना येणाऱ्या अडीअडचणी व समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार-सूर्यकांत कदम
मुंबई (चाळीसगाव प्रतिनिधी ) – संपूर्ण भारतभरात 16 राज्यात कार्यरत असणारी व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशन (पत्रकार संघटना) च्या महाराष्ट्र, गोवा व गुजरात प्रभारी प्रदेश अध्यक्ष पदी दैनिक भास्कर चे पत्रकार सूर्यकांत एस कदम (चाळीसगाव जि जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे,श्री सूर्यकांत कदम (9860791864) यांच्याकडे या आगोदर महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदाची जबाबदारी होती, त्यांच्या नियुक्ती ची घोषणा दि 19 फेब्रुवारी रोजी अखंड भारताचे आदर्श व दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती च्या दिवशी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रमोद जी वाचस्पती, केंद्रीय संयुक्त प्रभारी अजयकुमार मिश्र, केंद्रीय संयुक्त सचिव आबासाहेब सूर्यवंशी, केंद्रीय सचिव संजय पांडे, प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव कांबळे आदी पदाधिकारी यांनी केली आहे.
नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.