अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी अशपाक शेख (जामदा)
चाळीसगाव(प्रतिनिधी)-मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानांतर्गत राबविलेल्या मिशन डिजिटल मचान सन्मान सोहळा नुकताच दि 20 फेब्रुवारी रोजी राजपूत मंगल कार्यालय चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आला यावेळी राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय जामदा चे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव देवसिंग ठोके यांना मिशन डिजिटल मचान सन्मान गौरव पत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला
नवी दिल्ली येथील कार्यरत मिशन डिजिटल मचान ही एक इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप व नवोदय परीक्षांची ऑनलाईन पद्धतीने तयारी करून घेणारी संस्था आहे.
ग्रामीण भाग शिक्षण व तंत्रज्ञानाच्या बाबतीत शहरी भागाच्या व जगाच्या तुलनेत मागे पडत आहे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेची कमतरता नाही तर त्यांना संधीची कमतरता आहे ही दरी भरून काढणे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची ओळख करून देणे हा या संघटनेचा उद्देश आहे ग्रामीण भागातील ही गरज ओळखून नवी दिल्ली संचलित या उपक्रमाची जळगाव जिल्ह्यातून ग्रामीण भागात सर्वप्रथम माध्यमिक विद्यालय जामदा या विद्यालयाने सुरुवात केली विद्यार्थी दररोज ऑनलाईन शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करू लागले या गौरवार्थ माध्यमिक विद्यालय जामदा चे मुख्याध्यापक यांना डिजिटल मचान सन्मानाने गौरवण्यात आले
सदर ऑनलाईन शिक्षण पद्धतीने विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाचा व तंत्रज्ञानाचा अनुभव घेत आहे
यावेळी कार्यक्रमास म डॉक्टर उज्वल कुमार चव्हाण अपर आयुक्त आयकर विभाग मुंबई तसेच माननीय श्री एम राजकुमार पोलीस अधीक्षक जळगाव,माननीय श्री अभय देशमुख पोलीस उपअधीक्षक चाळीसगाव व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते