अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती जमाती , भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास वर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे पदोन्नतीतील आरक्षण देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीचे राज्य महासचिव गौतम कांबळे यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .या निवेदनाची प्रत दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांना देण्यात आली आहे .
या मागणी विषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गौतम कांबळे म्हणाले की,पुढील संदर्भानुसार १)मा .सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दिनांक-२२ जानेवारी २०२२
२) मा .केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना दिनांक:१८ एप्रिल २०२२ नुसार विनंती करण्यात येते की २०१७ पासून महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीयांना पदोन्नतीतील आरक्षण देणे बंद करण्यात आले आहे .परंतु केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना व सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय या बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने सर्व मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नतीमधील आरक्षण देणे आवश्यक आहे .त्यासाठी आवश्यक ती कारवाई करून लवकरात लवकर मागासवर्गीयांना पदोन्नतीमधील आरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .