संपादक गफ्फार शेख
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-एकी कडे शासकीय कर्मचारी जुनी पेंशन योजनेसाठी आंदोलन करत आहेत तर दुसरी कडे खासदार व आमदार यांची पेंशन बंद करावी या मागणी साठी 2 सामाजिक कार्यकर्ते यांनी दि 20 मार्च रोजी लक्षवेधी एकदिवसीय उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की भारतातील 552 खासघर व 4033 आमदार यांना दरमहा मिळणारी पेन्शन विनाविलंब बंद करण्याचे बील मंजूर करून अंमलबजावणी करण्यात यावी. बहुतांश आमदार खासदारांकडे त्यांच्या पुढील 10 पिढ्या बसून खातील एवढी स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे समजते आमदार-खासदारकी ही जनसेवा प्रकारात येतो. सर्वच माजी आमदार-खासदारांना पेंशन दिल्यामुळे शासन तिजोरीवर प्रचंड बोजा येतो. जे शासकीय / निमशासकीय अधिकारी कर्मचारी वय -वर्षे 58 ते 60 पर्यंत सेवा बजावतात, त्यांना पेंशन बंद आणि आयुष्यात एकदा आमदार – खासदार झाल्यास आमरण पेंशन ? हे आता बंद झाले पाहिजे लोकनिर्वाचित आमदार-खासदार स्वःताची पेंशन त्याग करणार नाहीत, ही आमची धारणा असल्याने नाईलाजास्तव 20 मार्च 2023 (सोमवार) रोजी तहसिल कार्यालय, चाळीसगाव समोर एक दिवसीय लक्षवेधी उपोषण करणार आहोत अशी माहिती एक परिपत्रक द्वारे राकेश रामदास निकम रा चाळीसगाव व दीपक शिवाजी पाटील रा पाटणा(चाळीसगाव) यांनी दिली आहे.