संपादक गफ्फार शेख
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- प्रभाग क्रमांक 2 येथील पंचशील नगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य सेवा देण्यासाठी डॉ. राहुल साळुंखे स्त्री रोग तज्ञ, डॉ. चंदा राजपूत बालरोग तज्ञ, डॉ अनुराधा खैरनार स्त्री रोग तज्ञ तसेच पीपल्स सोशल फाउंडेशन अध्यक्ष-ॲड.आकाश पोळ उपस्थित होते शिबिराच्या माध्यमातून महिला पुरुष व बालकांचे आरोग्य तपासणी करून औषधोपचार देण्यात आले तसेच गर्भवती महिलांनी गर्भावस्थेमध्ये काळजी घेण्या संदर्भात डॉक्टर राहुल साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.तसेच औषध उपचाराने शरीराचे तर शिक्षणाने मानसिक आजार दूर होत असतात.म्हणून चांगल्या आरोग्यासोबत चांगले शिक्षण पण गरजेचे आहे असे मत यावेळी ॲड आकाश पोळ यांनी व्यक्त केले. परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला तसेच शिबिर यशस्वीतेसाठी पीपल सोशल फाउंडेशनचे lराकेश सरोदे,राकेश त्रिभुवन,श्रीकांत आव्हाड,सचिन पवार,साहिल आव्हाड,सनी सरोदे, प्रतीक पवार अजिंक्य जाधव व
नर्स, एल एच व्ही, ए एन एम,आशा सेविका आदि. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनुराधा खैरनार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता चौधरी यांनी केले