अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड महिला प्रतिनिधी योगिता रसाळ
दौंड(प्रतिनिधी)-पिडीत महिलांच्या तक्रारी ऐकून त्या तातडीने सोडविण्यासाठी “महिला आयोग आपल्या दारी” हा ४ उपक्रम सुरू केला आहे – आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, तक्रारदार महिलांना आयोगापर्यंत पोहचता यावे, यासाठी टोल फ्री क्रमांक 155209 सुरु करण्यात आला आहे. यावर राज्यातील कोणत्याही भागातून गावातून संपर्क करता येईल महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई येथे असल्याने महिलांना मुंबई येथे पोहचने शक्य होत नाही. यासाठी हा उपक्रमा हा उपक्रम असून राज्यातील विविध जिल्हयातील पिडीत तक्रारदार महिलांना हा टोल फ्री क्रमांक भेट असून यामुळे महिलांना बळ मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले. प्रशासनाला हिरकणी कक्ष, अवैध गर्भपात प्रकरण, कौटुंबिक हिंसाचार,बालविवाह या बाबत प्रतिबंधानात्मक कार्यवाही कारवाई करण्यासाठी सूचना करण्यात आल्या असून तक्रारीच्या अनुषंगाने १५ दिवसांचा कालावधीमध्ये अंमलबजावणी करून अहवाल सादर करावा असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले