अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
दौंड(प्रतिनिधी)- माय रमाई फाउंडेशन आयोजित.जागतिक महिला दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती याचे औचित्य राखून, रमाई लेक,भिमाची वाघीण,गायक,कवी यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यात योगिताताई मधुकर रसाळ यांची समाजसेविका आणि रमाईची लेक म्हणून समाजसेविका तृप्ती ताई देसाई यांच्या हस्ते ट्राफी,सन्मानपत्र व मेडल देऊन सन्मान आणि गुणगौरव करण्यात आला. योगिता रसाळ यांनी केलेले सामाजिक कार्य व नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन निर्माण केलेले आपली ओळख यामुळे रसाळ यांना हा पुरस्कार मिळाला असून यापुढे देखील असे सामाजिक कार्य सुरू असणार असून या पुरस्काराने जबाबदारी वाढली असून अजून स्फूर्तीने समाज हितासाठी कार्य करण्याचे बळ मिळाले असल्याचे योगिताताई रसाळ यांनी सांगितले.योगिताताई रसाळ यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध स्तरातून मान्यवरांनी रसाळ यांचे कौतुक केले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.