संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-तब्बल 32 वर्षानंतर भाजपचा बुरुज ढासळला आहे. कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. रवींद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केलं आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा दणका मानला जात आहे. विशेष म्हणजे राज्यात सत्ता असूनही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. शिवाय शिंदे गटाचा आणि मनसेचा पाठिंबा असतानाही भाजपला ही सीट राखता आलेली नाही. त्यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.श्री रवींद्र धंगेकर यांच्या विजयाची बातमी कळताच चाळीसगाव काँग्रेस तर्फे आज दिनांक २ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून व पेढे वाटून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार ईश्वरभाई जाधव, ज्येष्ठ नेते अशोक खलाणे, प्रदीप देशमुख, माजी शहराध्यक्ष देवेंद्रसिंग पाटील, महिला काँग्रेस अध्यक्ष अर्चनाताई पोळ, काँग्रेस पदाधिकारी रवींद्र पोळ, नितीन पवार ,पंकज शिरोडे, आप्पा चौधरी, सुधाकर कुमावत, जितेंद्र भोसले, छोटू गवळी, सचिन गवळी, गजानन कासार, अनिता सूर्यवंशी, सलीम भाई,गयास बाबा, विशाल राठोड आधी पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.