संपादक गफ्फार शेख
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
अशा प्रकारची अवैध धंदयांविरुध्द धडक कारवाई मोहीम सुरू राहणार असून जर कोणाला अवैध धंद्यांविषयी माहिती असल्यास माहिती कळवत पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. आपले नाव गुप्त ठेवत अवैध धंदे चालकांवर कारवाई केली जाईल
चाळीसगाव उपविभागाचे पोलीस अधीक्षक श्री. अभयसिंह देशमुख
पाचोरा(प्रतिनिधी)-आपल्या नावाने अवैध धंदे चालकांना धडकी भरविणारे चाळीसगांव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांची पुन्हा पाचोरा येथे धडक कारवाई अवैध धंदे चालकांच्या गोटात खळबळ.
गोपनिय बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाल्यावरुन पाचोरा शहरात भाजी मंडी भागात जवाहर बॅग या दुकानाचे शेजारी लोकांकडुन पैसे व अंक घेवुन सटटा जुगाराचा खेळ खेळत व खेळवित आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने चाळीसगांव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक पथकाने छापा टाकत १ लाख १५ हजार ६९० रु च्या मुद्देमाला सह सट्टा मालक व १९ आरोपींना घेतले ताब्यात.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा शहरातील संतोष पांडुरंग पाटील पिढी मालक भाजी मंडी भागात जवाहर बॅग या दुकानाचे शेजारी लोकांकडुन पैसे व अंक घेवुन सटटा जुगाराचा खेळ खेळत व खेळवित आहे अशी गुप्त माहिती उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाली होती.मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकला असता सदर ठिकाणी दोन पंचानसह दि. १३ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी छापा टाकला असता, १) अविनाश खंड सुर्यवंशी २) रविंद्र हिंमत महाले ३) अनिल विश्वनाथ वाणी ४) सचिन चांगदेव जाधव ५) नाना संतोष पवार (भिल) ६) विष्णु सदाशिव महाजन ७) शब्बीर रमजान बागवान ८) लक्ष्मीकांत गोपाल वैदय ९) हिरालाल नथ्थु सोनवणे १०) नाना यशवंत पाटील ११) शोभराज साहेबराव कुमावत १२) जगदिश बसवराव जाधव १३) एकनाथ शशिकांत पाटील १४) गोपाल तुकाराम लोहार १५) सुभाष राजाराम भिल १६) कडुबा कौतिक कुंभार १७) सुरेश दयाराम पाटील १८) भिकन पुंडलीक पाटील १९) दिनकर चिंधा पाटील २०) संतोष पांडुरंग पाटील (सटटा पिढी मालक) असे आरोपी सटटा खेळतांना व खेळवितांना मिळुन आल्याने त्यांचेच कब्जात अंग झडतीत ८३ हजार ६९०/- रु. रोख व इतर साधन सामुग्री व सटटा जुगाराचे साधने असा एकुण १लाख १५ हजार ६९०/- रु. चा मुददेमाल मिळुन आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक जळगांव श्री. एम. राज कुमार साहेब, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव श्री. रमेश चोपडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगांव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक श्री. अभयसिंह देशमुख यांनी व त्यांचे कर्मचारी वर्गाने केलेली आहे. सदर गुन्हेबाबत नापोकॉ अजयसिंग पदमसिंग राजपुत यांनी फिर्याद दिल्यावरुन पाचोरा पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर छापा कारवाईमध्ये चालक पोकॉ महेश अरविंद बागुल, पोना राजेंद्र अजबराव निकम, पोकॉ सुनिल सखाराम पाटील, पोकॉ पवन कृष्णा पाटील, पोकॉ अजय अशोक पाटील, अशांचे पथकाने योग्य ती मदत केली आहे.