संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
अवैध गौण खनिज वाहतूक व अवैध वृक्षतोड विरोधात शहर पोलीस प्रशासनाने कारवाई ची सुरवात केली आहे,मात्र आता गरज आहे महसूल प्रशासन व वन विभागाच्या अधिकारी यांनी पुढाकार घेऊन कारवाईंचा धडाका सुरू ठेवण्याची जेणे करून अवैध वाळू उपसा व वाहतूक तसेच अवैध वृक्षतोड व वाहतूक थांबेल.
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहर पो.स्टे. हद्दीत अवैध गौण खणिज (वाळु) व वृक्षतोड करुन वाहतुक होत असल्याची माहीती पोलीस स्टेशनला प्राप्त झाले वरुन सदर माहीतीच्या अनुषंगाने मा. श्री.एम. राजकुमार सो. पोलीस अधिक्षक यांचे तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्री रमेश चोपडे व मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे आम्ही पोलीस निरीक्षक संदीप पाटील, तसेच पोहेकॉ/नितीश पाटील, पोना/विनोद भोई, पोकॉ/संदीप पाटील, पोकॉ/नरेंद्र चौधरी असे चाळीसगांव शहर पो.स्टे. हद्दीत रात्रगस्त पेट्रोलींग करीत असतांना दिनांक 16 मे 2023 रोजी रात्री 1 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास मंडाई पेट्रोल पंपसमोर भडगांव रोडकडुन एक पांढऱ्या रंगाचे विना नंबरचे ढंपर चाळीसगाव शहराकडे येतांना दिसल्याने त्यात वाळुची चोरटी वाहतुक होत असलेल्या बाबत आम्हाला संशय आल्याने ढंपर चालकाला ढंपर थांबविण्याबाबत इशारा करुन, आवाज दिला असता. सदर ढंपर चालकाने ढंपर थांबविले नाही म्हणुन आम्ही त्या ढंपरचा पाठलाग करुन ढंपर थांबविले. ढंपरमध्ये डोकावुन लक्षपुर्वक पाहीले असता त्यात गौण खणिजने (वाळु) भरलेले असल्याचे दिसुन आल्याने पंचनामा करुन, 1) 6 लाख रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे, टाटा कंपनीचे, विना नंबरचे ढंपर, व 2) 18 हजार रुपये किमतीचे तीन ब्रास गौण खनिज (वाळु) व नमुद चालकास ताब्यात घेवुन इसम नामे दिलीप शिवाजी गुंजाळ वय 32 वर्षे धंदा- ड्रायव्हर रा. धुळे रोड, पुंशी पेट्रोल पंपाच्या मागे, चाळीसगांव याच्या विरुध्द भादवि कलम 379, सह खाण आणि खनिज अधिनियम 1957 चे कलम 21, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 48(7), 48(8) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्ह्याचा तपास पोना/किशोर पाटील हे करीत आहेत.
तसेच सकाळी 06.00 वाजेच्या सुमारास पातोंडा गावाकडुन येणारे एक लाल रंगाचे ट्रँक्टर क्रमांक एम.एच.41 ए.ए.3105 मध्ये इसम नामे शेख ईब्राहीम गफुर मनीयार वय 27 वर्षे रा. वाघळी ता. चाळीसगांव हा विनापरवाना लाकडाचे ओंडके वाहतुक करतांना मिळुन आल्याने सदरचे ट्रँक्टर पोलीस निरीक्षक, संदीप पाटील यांनी ताब्यात घेवुन पुढील कारवाईकामी वन विभाग, चाळीसगांव यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे.