संपादक गफ्फार शेख(मालिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-चेअरमन निष्काम कर्मयोगी,थोर स्वातंत्र्य सेनानी,शिक्षणाची गंगा शहरासह ग्रामीण भागातील तळागाळात नेऊन शिक्षणाची कवाडे उघडणारे व्रतस्थ,सानेगुरुजींचे पुरस्कर्ते,हरिभक्त पारायण,दिनदलितांचे कैवारी,निसर्गप्रेमी,ज्ञानतपस्वी,प्रसिद्ध कायदे तज्ञ,कर्मवीर शिक्षणमहर्षी स्वर्गिय नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण यांच्या १४व्या स्मृतीदिनानिमित्त विविध माध्यमांतून व स्तरांतून त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये नानासाहेबांना आदरांजली वाहत प्रतिमापूजन करण्यात आले,यावेळी नानासाहेबांच्या अनमोल कार्याची माहिती देण्यात आली,
हिरापूर रोड येथील स्वर्गीय नानासाहेबांच्या समाधीस्थळावर सकाळपासूनच अनेक क्षेत्रातील मान्यवर,संस्थेचे संचालक,प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी भेट देत नानासाहेबांच्या समाधीवर फूले वाहून अभिवादन केले, यावेळी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. डाॕ.बापूसाहेब विनायकराव चव्हाण,सचिव प्राचार्य श्री.आबासाहेब बाळासाहेब चव्हाण,जेष्ठ संचालक श्री.आर्किटेक्ट धनंजयराव चव्हाण तसेच राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ व विविध शाखेतील मुख्याध्यापक तसेच अनेक सेवानिवृत्त मुख्याध्यापक,शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.