संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-आज 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा या सोहळ्यासाठी चाळीसगाव तालुक्यातून तब्बल 4 हजार शिवभक्त रायगड कडे रवाना झाले ते आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून आज 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार होणार.
पण नुसतं शिवभक्तांना शिवराज्याभिषेक साठी रायगडावर पाठविले आणि जबाबदारी संपली असे नाही तर आमदार चव्हाण यांनी आपली जबाबदारी सुरू झाली असल्याचे दाखवत स्वतः या तरुणाई सोबत प्रवास सुरु केला.त्यांच्या आंघोळीपासून ते रात्री झोपण्यापर्यंतची व्यवस्था उत्तम रित्या करण्याचा पुरे पूर प्रयत्न केला आहे.दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्तांची गर्दी झाली असल्याने गडाच्या खाली जवळपास ५० – ७५ हजार शिवभक्त अडकले आहेत. इतके लोक गडावर सामावणे शक्य नसल्याने गडावर गेलेले शिवभक्त परत येईपर्यंत खाली असलेल्या शिवभक्तांना जाणे शक्य होणार नसल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या आमदार असल्याचा फायदा घेत स्वतः इकडे गडावर गेले नाही तर आपल्या सोबत असलेल्या तालुक्यातील तरुणाईला सोबतच घेऊन रायगडावर महाराजांच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे निर्धार करत त्यांनी चाळीसगाव तालुक्यातील शिवप्रेमींसोबत रायगडाच्या रस्त्यावरच विश्रांती घेतली. रायगडाची पवित्र माती ही काही राजशय्येपेक्षा कमी नाही आणि शिवभक्तांमध्ये कुणीच छोटा आणि कुणीच मोठा नाही याची प्रचितीच यानिमित्ताने आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.राज्य परिवहन महामंडळाच्या 45 ते 50 एस टी बसेस मधुन तसेच 100 च्या जवळपास खाजगी वाहनातून तब्बल 4 हजार तरुण चाळीसगावतून रायगडच्या दिशेने रवाना झाले आहेत.सलग चौथ्या वर्षी चाळीसगाव तालुक्यातील तरुणांना आमदार मंगेश चव्हाण स्वखर्चाने रायगड वारी घडवून आणत आहे.पण गर्व न करता आपले पाय जमिनीवर ठेवत शिवभक्तांच्या सोबतच प्रवास करून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आहे.