अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
करमाळा(वृत्तसेवा)-ग्रामीण भागातील सागर पवार या युवकाची कौतुकास्पद कामगिरी,नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेत सागर जयवंत पवार या युवकाने यशस्वी कामगिरी केली असून नुकतीच त्याची पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे .सागर जयवंत पवार हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सरपढोह या ग्रामीण भागातील युवक आहे .सागर पवारचे वडील जयवंत पवार हे प्राथमिक शिक्षक असून पुणे जिल्ह्यात कार्यरत आहेत .त्यांनीही आदर्श शिक्षक म्हणून जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे .सागर ने आपल्या वडिलांचा आदर्श समोर ठेवून हे उज्वल यश मिळवले आहे .सागर हा बी ई मेकॅनिकल डिग्री घेतलेला तरुण युवक आहे .सागर ने आपल्या ग्रामीण भागातील युवकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे .सागरच्या मूळ गावी सरपढोह येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला तसेच पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथेही पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला .समाजातील सर्व घटकांकडून सागर वर कौतुकाचा वर्षाव होत आहे .महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीनेही सागरचे अभिनंदन करण्यात आले .यावेळी राज्याध्यक्ष गौतम कांबळे राज्य महासचिव विठ्ठल सावंत राज्य सल्लागार दिगंबर काळे व सागरचे वडील आदर्श शिक्षक व काट्राईब शिक्षक महासंघाचे राज्य कोअर कमिटी सदस्य जयवंत पवार उपस्थित होते .