संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
बिलाखेड(प्रतिनिधी)-ता. चाळीसगाव – देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने नऊ वर्षात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. हीच कामगिरी जनतेच्या दारात जावून कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे पोहचवावी. यासाठी मोदी @ 9 उपक्रमातून जनसंपर्क अभियान सुरु आहे. जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा संवादातून पक्षाला बळकटी मिळावी याच भावनेतून आज टिफिन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पक्षाच्या जडणघडणीत ज्यांनी ज्यांनी दीर्घकाळ योगदान दिले त्यांचे मार्गदर्शन घेतले.जून्या नेत्यांचे अनुभव आणि नवोदित कार्यकर्त्यांचा उत्साह हा संगम पक्षाला उभारी देणारा असून आजची एकजुट कायम ठेवा पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे आहे.अशी भावना खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली.
आज बिलाखेड ता. चाळीसगाव येथील स्व.उत्तमराव पाटील वनउद्यानात मोदी @9 उपक्रमांतर्गत टिफिन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी खासदार उन्मेश पाटील बोलत होते..
कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते योगाचार्य बाबासाहेब चंद्रात्रे, जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, जिल्हा सरचिटणीस एड. प्रशांत पालवे, माजी जि.प.सदस्य मोहिनी अनील गायकवाड,भाऊसाहेब खंडू जाधव, विद्याभारती देवगिरी प्रांतमंत्री प्रकाश पोतदार, माजी नगरसेवक संजय घोडेस्वार, माजी नगरसेवक काकासाहेब घोडे,विवेकचे शेटे आप्पा, विहीप प्रखंड मंत्री विजय बाविस्कर, जितुभाई पटेल, डॉ.सुभाष निकुंभ, पंसचे माजी सभापती संजय पाटील, पंस सदस्य कैलास पाटील,दिनेश बोरसे, भाऊसाहेब पाटील, सुभाष भामरे, ऍड.विकास देवकर, तालुका सरचिटणीस गिरीश ब-हाटे, व्यापारी आघाडीचे विशाल सोनगीरे, सोशल मीडिया प्रमुख बाजीराव अहिरे, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष विजुदादा पाटील,वैद्यकीय आघाडी तालुका अध्यक्ष डॉ.रवींद्र मराठे, पंचायत समिती माजी सदस्य रवींद्र चौधरी , पि ओ महाजन सर ,शिवदास महाजन, दत्तात्रय सूर्यवंशी,जामडी उपसरपंच संजय पाटील, वाघडू उपसरपंच प्रवीण पाटील ,नंदू पाटील, हभप काशिनाथ चौधरी, किरण जोशी, ज्ञानेश्वर पाटील, सुभाष चौधरी तरवाडे, दीपक एरंडे ,अनिल पाटील तांबोळे, किशोर आबा पाटील भोरस,टाकळी प्रचा सरपंच चंद्रकांत महाजन, आनंदा पाटील, संतोष मोरे, सुजित गायकवाड, धनसिंग उशीर,डॉ.गोपाल सूर्यवंशी,किशोर गुंजाळ रायबा जाधव, घनश्याम पाटील, नरेंद्र काका जैन,रवीआबा राजपूत, मामासाहेब पाटील,सारंग जाधव, गणेश पाटील, बंडू पगार, राजूभाऊ पगार, अरुण पाटील,गणेश महाले, मनोज चौधरी, अग्गाभाई शेख,फय्याज शेख,अनिल चव्हाण, मंदार नेरकर सर, सुनील रणदिवे, वाल्मीक महाले, भाऊसाहेब पाटील, सुनील महाजन, राकेश शिरोळे, अण्णा कांबळे, प्रदीप पाटील, देविदास पाटील, सुपडू पाटील, हिरामण पाटील,विनोद महाजन,सतीश पिंटू आहेर, दिनेश पाटील, शेषराव चव्हाण, रमेश पाटील,रावसाहेब पाटील, सागर मुंडे, वाल्मीक नागरे, नंदू नागरे ,दत्ताभाऊ नागरे ऍड.सागर पाटील, दिनेश पवार, सचिन पाटील,वाल्मीक पाटील, वासुदेव पाटील,बंडादादा पाटील ,श्याम पाटील, मनोज चौधरी, बंटी चौधरी, मकरंद पवार, पिंटूभाऊ मांडोळे, करण मांडोळे, शुभम कासार, सिद्धेश गुरव, महेंद्र राजपूत, दर्शन शिंदे, अमोल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
2024 च्या तयारी लागा
याप्रसंगी योगाचार्य बाबासाहेब चंद्रात्रे म्हणाले की मी 75 वर्षांपूर्वी चाळीसगावमध्ये आलो तेंव्हापासून जनसंघ ते भाजप असे काम करीत असताना मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून समाधानी आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्वात काम करत असताना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी देशात दहाव्या क्रमांकाची कामाची धडाडी सुरू ठेवली याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.आपण माझ्यासह सर्वजण उन्मेश दादा यांना पुन्हा खासदार करण्यासाठी 2024 च्या तयारी लागा असे आवाहन केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी आपला दिलखुलास परिचय करून दिला. स्वर्गीय उत्तमराव पाटील वनउद्यानाच्या निसर्गरम्य परिसरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अतीशय खेळीमेळीत टिफीन बैठक संपन्न झाली. के.बी.दादा साळुंखे यांनी प्रास्ताविक तर दिनेश बोरसे यांनी आभार मानले. अनेक कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.