संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात वाहतूक शाखेचे तर्फे दि 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजे दरम्यान रस्त्याच्या बाजूचे लागत असलेल्या लोट गाड्या व छोटे स्टॉल चे अतिक्रमण काढण्याची सुरुवात झाली आहे या कारवाईचे एकीकडे अभिनंदन होत असून दुसरीकडे ही कारवाई एकतर्फी होत असल्याचे कुजबुज देखील सुरू आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी आपल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना घेत चाळीसगाव शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे छोटे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेमध्ये स्टेशन रोडवरील रस्त्यावर असलेले हातगाडी,छोटे स्टॉल काढण्यास सुरवात झाली मात्र या कारवाईमुळे अनेक छोट्या व्यवसायिकांमध्ये नाराजीचे सूर निघत आहे आणि ही कारवाई फक्त या परिसरात केली जात आहे का की अशी कारवाई संपूर्ण शहरात केली जाणार आहे असा प्रश्न देखील छोटे व्यावसायिक करत आहेत.जर हातगाडी व छोट्या स्टॉल मुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे म्हणून परिसर मोकळा केला जात असल्यास अभिनंदन मात्र भडगाव रोड एसटी स्टँड समोरील परिसरात रोज रात्री 8 ते 10 वाजे दरम्यान लागणाऱ्या खाजगी लक्झरी बसेस मुळे वाहतुकीला कोंडी निर्माण होऊन वाहतुकीला अडचन निर्माण होत नाही का असा प्रश्न जनसामान्यांना पडलेला आहे तरी वाहतूक शाखेने बस स्टँड समोरील परिसरावर लक्ष केंद्रित करावे व रात्रीच्या वेळेस उभी असणारी खाजगी लक्झरी बसेसची रांग बंद करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी केली जाते नागरिकांच्या वतीने केली जात आहे.