संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत मा. श्री. अमन मित्तल जिल्हाधिकारी जळगांव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 05 जुलै, 2023 रोजी नगरपरिषद, चाळीसगांव येथील सभागृहात सकाळी 11.00 वाजता तालुका स्तरीय सर्व अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे व त्यांनतर नागरिकांना आपल्या विविध समस्या जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडता येणार.
शासन आपल्यादारी उपक्रमांतर्गत तालुका स्तरीय सर्व अधिकारी यांची बैठकीनंतर मा. जिल्हाधिकारी जळगांव हे नागरीकांशी त्यांच्या अडचणी संदर्भात संवाद साधणार आहेत.यावेळी तालुक्यातील जास्तीत नागरिकांनी आपल्या विविध समस्या तसेच कोणत्याही शासकीय कार्यालयात अडकलेली कामे व आपल्या परिसरातील इतर शासकीय कार्यालयाशी निगडित समस्या जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडत या उपक्रमाचा लाभ घ्यावा या संवाद कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहण्याबाबत तालुका प्रशासनाच्या वतीने सर्व तालुका वासीयांना आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे.