संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
पोलीसांतर्फे चाळीसगांव शहरात नशामुक्ती अभियान माग़िल दिड महिन्यापासुन चालु असुन अवैध दारु निर्मीतीची केंद्राचे समुळ उच्चाटनासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारचे नदी/नाला/ओढा /तलाव किंवा खाजगी क्षेत्रात विहीरीच्या बाजुला कोणी हातभट्टी लावुन अवैधरित्या गावठी दारु तयार करत असेल त्याची माहीती चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला द्यावी-पोलीस निरीक्षक संदीप पाटील
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहराच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टीची दारु तयार करणारे ०५ आरोपिंवर चाळीसगांव शहर पोलीसांकडुन कारवाई १ लाख ३८ हजार ४० /- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येवुन कच्चे रसायन व साहित्य जागिच नष्ट करण्यात आले आहे.
मा.पोलीस अधिक्षक सो. जळगांव यांनी “ गावठी हातभट्टी दारु तयार करणाऱ्यांवर दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी विशेष मोहीम राबवुन कार्यवाही करावी “ असे आदेशित केल्याने, मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्री रमेश चोपडे व मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे श्री. संदीप पाटील, पोलीस निरीक्षक , चाळीसगाव शहर पोलीस ठाणे यांनी पथक तयार करून चाळीसगांव शहर पो.स्टे. हद्दीतील टाकळी प्र.चा. , ओझर व पातोंडा ग़ावांचे शेतशिवारातील अवैध गावठी हातभट्टीची दारु तयार होत असलेल्या ०५ ठिकानांची खात्रीशिर माहीती काढ़ली.. सदर ०५ ठिकाणी अधिकारी व अंमलदार यांनी छापा टाकून कायदेशीर कारवाई करुन गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याचे ३५० लिटर उकळते रसायन, २८०० लिटर कच्चे रसायन व ७३ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु, मोटार सायकल व मोबाईल असे एकुण १ लाख ३८ हजार ४० /- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येवुन कच्चे रसायन व साहित्य जागिच नष्ट करुन आरोपी नामे १) संतोष छगन दळवी रा.टाकळी प्र.चा.ता.चाळीसगांव, २) प्रकाश पांडु गायकवाड रा.टाकळी प्र.चा.ता. चाळीसगांव, ३) जयवंताबाई जयराम सोनवणे रा.टाकळी प्र.चा.ता.चाळीसगांव, ४) जंगलसिंग रामसिंग गायकवाड रा.ओझऱ ता.चाळीसगांव, ५) रमेश नाईक रा.ओझर ता.चाळीसगांव यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सदर कारवाईत शहर पोलीस स्टेशन चे सपोनि/सागर ढिकले, सपोनि/विशाल टकले, पोउपनि/सुहास आव्हाड, पोहेकॉ अजय मालचे, पंकज पाटील, पोना किशोर पाटील, राकेश पाटील,भुषण पाटील, पो शि चतेरसिंग महेर, प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर गिते, राकेश महाजन, समाधान पाटील, सुनिल निकम, ज्ञानेश्वर पाटोळे,विजय पाटील, आशुतोष सोनवणे, दिलीप राक्षे, रविंद्र बच्छे, सुनिल पाटील यांच्या पथकाने केली आहे.