संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(अधिकार आमचा विशेष)- सर्वसामान्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वप्न घेऊन निघालेले कर्तव्यनिष्ठ आमदार मंगेश चव्हाण यांचा आज वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
नेहमीच आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर व आपल्या दातृत्वाच्या हिमतीवर चर्चेत असणारे आमदार चव्हाण यांनी अनेक परिवारांच्या सुखादुःखात सामील होत स्वप्न पूर्ण करण्याचा धडाका सुरू केला. वयोवृद्धांना विठू माऊलींचे देवदर्शन मुलाप्रमाणे स्वखर्चाने आरामदायी प्रवास घडवत जेवण चा खर्च ते दर्शनापासून सर्व उत्तम व्यवस्था केली,तरुणांचे आदर्श असलेले छत्रपती शिवराय यांचे दर्शन अगदी मनापासून अविस्मरणीय प्रवास,जेवण सर्व सुविधा देत तरुणांना रायगड येथे स्वखर्चाने पाठवात पूर्ण केले. शहरात आलेले कोणतेही संकट असो पूर असो की अचानक आलेले आसमानी संकट नेहमीच तालुकावासीयांसाठी मदतीसाठी पुढाकार घेणारे पुढाकार घेऊन आदेश न करता मदत करणारे,नुसतं रक्षाबंधन ला राखी बांधून बाजूला झाले नाही तर भाऊ बनून अंगणवाडी सेविका असलेल्या सर्व बहिणींना शब्द दिला मुलींच्या लग्नाला 25 हजारांची मदत देणार आणि सुरवात करून शब्द देखील पाळला.शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारे शेतकऱ्यांसाठी जेलवारी केली.जनसामान्यांसाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरले अशी अनेक कामे करून तालुकावासियांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे असणारे आमदार चव्हाण हे कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे नेतृत्व आहे ते म्हणतात ते किती आहे या ने फरक पडत नाही कोणाच्या किती कामी येते ते महत्वाचे आहे आणि आमदार चव्हाण यांच्या कडे तर मदतीसाठी दार उघडेचं आहे.उत्तम व्यावसायिक,पुत्र,पती,मार्गदर्शक,नेतृत्व,दातृत्व,आमदार ते अति उत्तम माणुसकीचे जिवंत उदाहरण अश्या अनेक भूमिका जीवनात उत्कृष्टपणे साकारणारे आमदार मंगेश चव्हाण यांच्या जीवनाचा चित्रपट हिट आहे हिट रहावा.आपणास वाढदिवसाच्या मनापासून पुनश्च हार्दिक शुभेच्छा.लोकांना प्रामाणिक पणे मदत करताना पैसे कधीही अडथळा झाले नाही,शहरात पैशाने अनेक श्रीमंत आहेत मात्र मनाने नाही म्हणूनच मदत करण्यासाठी पाहिले पैसे लागत नाही तर मनाची श्रीमंती लागते आणि ती आहे आमदार मंगेश चव्हाण यांच्या कडे यामुळे पैश्यांने नाही तर मनाने देखील श्रीमंत असायला हवे आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे फक्त आमदार मंगेश चव्हाण केवळ राजकारण नाही तर समाजहित पाहिले…..