संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी) – शहरात सर्वत्र डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी खासदार उन्मेश पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेत याविषयी नाराजी व्यक्त केली. खासदार उन्मेश पाटील यांनी परिसरातील रुग्णालयात जावून वस्तुस्थिती जाणून घेतली. जेष्ठ ते विद्यार्थी सर्वांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून याबाबत नागरिकांनी पालिकेकडून कुठलीही ठोस उपाययोजना राबविली जात नसून आपण याबाबत ठोस भूमिका घेण्याची विनंती केली. या संतप्त नागरिकांना घेऊन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी नगरपालिकेवर धडक दिल्याने पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या आठवड्यात लक्ष्मीनगर परिसरातील नववीत शिकत असलेला उद्योन्मुख खेळाडू यश विवेक काळे यांच्या डेंग्यू मुळे मृत्यू झाल्याचे घटना घडल्या पासून शहरात भीतीचे वातावरण पसरले होते.रुग्णालयामध्ये देखील तापाने फणफणत असलेल्या रुग्णाला रक्त लघवी तपासणी करण्याचा सल्ला दिला तरी रुग्णामध्ये भीती दिसून येत होती. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देखील शहरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तसेच
खासदार जनसंपर्क कार्यालय परिसरातील विविध रुग्णालयातील नातेवाईक यांच्या मध्ये डेंग्यू सदृश्य आजाराची साथ असल्याची भावना वाढीस लागत होती. या बाबींच्या अनुषंगाने खासदार उन्मेश पाटील यांनी सरळ पालिका कार्यालयात धडक दिली.
प्रशासनाची झाडाझडती
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी थेट पालिका कार्यालयात धडक दिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, स्वच्छता निरीक्षक संजय गोयर, पाणी पुरवठा अभियंता राजीव वाघ, वैद्यकिय अधिकारी डॉ. मंदार करंबळेकर, ग्रामीण वैद्यकिय अधिकारी डॉ अनुराधा खैरनार, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे, पालिका प्रशासन अधिकारी यांनी धावत पालिका गाठली. यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रशासनाची झाडाझडती घेतली. उपाययोजना करण्याची सूचना केली. तर वैद्यकिय अधिकारी यांनी शासकिय दवाखान्यासह खाजगी रुग्णालयात जावून रुग्णाची नोंदणी करुन उपचारासाठी मदत करावी असे आदेश दिलेत. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपण कागदोपत्री नोंदी न करता प्रत्यक्ष रुग्णाची आकडेवारी गोळा करावी.असे आदेश दिलेत.अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याने प्रशासनाचे त त फ फ झाले होते. यावेळी रुग्णाचे नातेवाईक,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.