संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 8 ऑक्टोबर 2023 रोजी अचानक अनु जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेत आमदार मंगेश चव्हाण यांची धडक आणि विध्यार्थ्यांच्या शिक्षणाची लागलेली वाट ते नित्कृष्ठ दर्जाच्या जेवणाची पोलखोल करत शिक्षक,अधिकारी,ठेकेदाराला “मी स्वतःपासून बदलाची सुरवात केली आहे तुम्ही पण करा” या एका वाक्यात दिली समज
अनु जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेत आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट देताच शिक्षक व कर्मचाऱ्यांची धांदल उडाली कार्यालयात जाऊन बसून विचार पूस न करता आमदार चव्हाण गेले ते थेट निवासी शाळेच्या स्वयंपाकघरात आणि दिसला तो किडलेले भाजीपाला यावेळी मात्र आमदारांचा राग अनावर झाला आणि यांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारात फटकारले व धुळे येथील गिंदोडीया नामक ठेकेदारास फोन लावत चांगला समाचार घेत केला प्रश्न की आपल्या मुलांना असला भाजीपाला खाऊ घालणार का? आणि ठेकेदाराचे उत्तर चुकी झाली आणि दुसरा प्रश्न एका विद्यार्थ्याचे अठराशे रुपये मिळतात तरी असले नित्कृष्ठ जेवण विद्यार्थ्यांना का? आणि ठेकेदार निरुत्तर लागलीच तपासणी अधिकाऱ्यास फोन करत जबाबदारीची आठवण करून दिली नंतर नंबर होता शिक्षकांचा दहावीच्या विद्यार्थ्याला इंग्लिश व मराठी ची इंग्लिश मध्ये स्पेलिंग विचारली असता ऊत्तर न मिळाल्याने शिक्षकांना विचारले दहावी पर्यंत जर विद्यार्थ्यांना वाचता येत नसेल तर तुम्ही करता काय मी तुमची बदली करणार नाही मात्र तुमच्यात बदल झाला पाहिजे अश्या एका वाक्यात संपूर्ण विषय स्पष्ट करत माझे पूर्ण लक्ष या निवासी शाळेवर असणार असल्याचे सांगितले.सामान्य कुटुंबातुन आलेले सामान्य कुटुंबासाठी झटणारे आमदार मंगेश चव्हाण हे आहेत आपल्या पदाचा गर्व न करता कर्तव्य समजून कार्य करत असतात त्यांनी बोलताना सांगितले की आभाळ फाटले आहे ते शिवण्याचा प्रयत्न करत आहे खर आहे. निवासी शाळेचा आहार पुरविण्याचा ठेका गेली सहा वर्ष एकाच ठेकेदारकडे कोणत्याही प्रकारची निविदा न करता देण्यात येत असल्याचे कळते याला कारणीभूत या मागे असणारी टक्केवारीचे कीड लागलेली यंत्रणा असणार यात शंका नाही आमदार चव्हाण यांनी आज पाहिले तर कळाले मात्र मागील सहा वर्षांपासून गोरगरिबांची मुलं गुपचूप हे कसे अन्न खात असेल याची कल्पना केली तरी मनभरून आल्या शिवाय राहणार नाही या खेळातील सर्व खेळाडू समोर आले पाहिजे नाहीतर परिस्थिती जैसे थी राहणार आमदार मंगेश चव्हाण आपले कार्याची उंची गगनाला भिडत आहे नक्कीच संपूर्ण नाही पण चाळीसगाव तालुक्यातील फाटलेले आभाळाला थिगळ नक्की लावल यात शंका नाही.