अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 13 डिसेंबर रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब चाळीसगाव दौऱ्यावर आले असताना त्यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मारकाला भेट देत अभिवादन केले तसेच प्रभाग क्र.13 मधील विविध विकास कामाची पाहणी केली व उत्कृष्ट अश्या प्रभागातील भरभरून केलेल्या विकास कामांचे जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा प्रभागाच्या नगरसेविका सौ.सायली रोशन जाधव यांचे मा. जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले.
तसेच त्यावेळी मा.जिल्हाधिकारी यांना उपस्थित सर्वांच्या वतीने केलेल्या विनंती ला पवित्र स्मारकाला ‘अ दर्जा शासकीय स्मारक’ करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे मा.जिल्हाधिकारी यांनी आश्वासित केले.
मा.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मा. प्रांताधिकारी प्रमोदजी हिले,तहसीलदार प्रशांतजी पाटील,नगर पालिका मुख्याधिकारी प्रशांतजी ठोंबरे आदींचे स्वागत तथा सत्कार करण्यात आले.
तसेच याप्रसंगी नायब तहसिलदार जितेंद्रजी धनराळे, विकास लाडवंजारी, संदेशजी निकुंभ न.पा. अभियंता राजीवजी वाघ, प्रदिपजी धनके, तहसील लिपिक प्रवीणजी,सामाजिक कार्यकर्ते रोशन जाधव,माझी नगरसेवक रामचंद्र जाधव,सामाजिक कार्यकर्ते ऍड गौतम जाधव व समाज बांधव उपस्थित होते.