संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
कजगाव ते चाळीसगाव प्रवास अवघ्या 25 मिनिटांचा असला तरी कजगाव येथून निस्वार्थपणे सुरू केलेला जीवनाचा प्रवास आज 52 व्या वर्षी चाळीसगाव पर्यंत पोहोचला आहे,आज निस्वार्थी समाजसेवक वर्धमान धाडीवाल यांचा 52 वा वाढदिवस या वाढदिवसाला हजरी लावणारी सामाजिक,राजकीय व इतर क्षेत्रातील मान्यवर मंडळी हे प्रामाणिक पणे सुरू असलेल्या वर्धमान धाडीवाल यांच्या समाजसेवेची पावतीच आहे.
कोरोना काळात भुकेल्यांना अन्न असो की गरजवंतांना बंद मुठी ने केलेली मदत यामुळे नेहमीच ज्यांच्याकडे आदराने पाहिले जाते असे समाजसेवक वर्धमान धाडीवाल हे आहेत. ज्यांना आधार असतो अशांना मदत करण्यासाठी म्हणजेच देखावा करण्यासाठी सर्वेच पुढाकार घेतात मात्र निराधारांना आधार देण्यासाठी पुढे येणारे प्रामाणिकपणे मदत करणारे नाव म्हणजे समाजसेवक वर्धमान धाडीवाल हे आहेत. त्यांनी अनेक अपंगांची लग्न लावून दिली सोबतच त्यांचा संसार थाटण्यासाठी आपल्या परीने सर्वोत्तरी सहकार्य केले.अपंगांना कृत्रिम अवयव असो की अपंगांसाठी त्यांच्या गरजेवर आधार बनणारे,नेहमी त्यांच्यासाठी धावत जाणारे समाजसेवक म्हणजे वर्धमान धाडीवाल.वाढदिवस असला की गाजावाजा करायचा,मोठ मोठे बॅनर लावत देखावा करत प्रसिध्दी मिळवायची या पासून अलिप्त असणारे ना गाजावाजा न देखावा अत्यंत साध्या पद्धतीने आपल्या कार्यालयात बसून आपल्या चाहत्या वर्गाच्या अत्यंत साधेपणाने शुभेच्छा स्वीकारणारे नाव म्हणजे वर्धमान धाडीवाल हे आहेत त्यांच्यावर लिहायला पुष्कळ आहे,पण एका वाक्यात त्यांची समाजसेवा लिहायची म्हणजे
“वो अभी रुका नहीं,वो अभी थका नहीं.
जीत चुका है दिल बहोत अपने कामोसे,पर उसकी अदा मे आजतक घमंड कभी दिखा नहीं “
नॉनस्टॉप 52 वर्ष समाजसेवक वर्धमान धाडीवाल….