
संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- बुध्दगया येथील महाबोधी महाविहार १९४९ च्या व्यवस्थापन अॅक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौध्दांच्या हाती देण्यात यावे असे निवेदन दि 6 मार्च रोजी शहरातील संविधान प्रेमी,आंबेडकर प्रेमी तसेच धम्म उपासक व उपासिका यांच्या वतीने चाळीसगाव तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
बुध्दगया येथील महाबोधी महाविहार १९४९ च्या व्यवस्थापन अॅक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौध्दांच्या हाती देण्यात यावे तसेच बुध्दगया महाबोधी महाविहार येथे सुरु असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरीत मंजूर करण्यात याव्यात,जगभरातील व देशातील सर्व बौध्द बांधवांच्या भावनेचा विचार व आदर करून १९४९ च्या व्यवस्थापन अॅक्टमध्ये दुरुस्ती करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन चाळीसगाव येथे तहसीलदार प्रशांत पाटील यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती भारत सरकार, प्रधानमंत्री भारत सरकार यांना चाळीसगांव शहरातील संविधान प्रेमी व आंबेडकर प्रेमी तसेच धम्म उपासक व उपासिका यांच्या वतीने देण्यात आले आहे.
यावेळी रामचंद्र जाधव , रोशन जाधव, गौतम,जाधव, बबलू जाधव,स्वप्नील जाधव ,शरद जाधव मुकेश नेतकर, सागर निकम, सोनू आहिरे आदित्य रणधीर, अमोल मोरे , संदीप केदार , अशोक जाधव, सुरेश अण्णा चौधरी, संगम गवळे,अँड आकाश पोळ, सचिन पवार, रुपेश पवार, अँड.नितीन मोरे, अँड.दिपक मोरे, प्रभाकर पारवे सर, दिनेश मोरे, हेमराज आहिरे आदी उपस्थित होते.