Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

चाळीसगाव तालुक्यातील ११८.९ किमी रस्त्यांचे उजळले भाग्य आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश….

0
3 0
Read Time3 Minute, 38 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगाव(प्रतिनिधी) – गेल्या अनेक दशकांपासून चाळीसगाव तालुक्यातील अनेक ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग हे जिल्हा परिषदेकडे वर्ग असल्याने त्यांना राज्य शासनाचा निधी उपलब्ध होण्यास अडचणी येत होत्या. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने नवीन भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना युती सरकारच्या माध्यमातून ३१ इजिमा व ग्रामा यांच्या एकूण ११८.९ किमी रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्यात आली आहे. तसा शासन निर्णयच प्रकाशित झाल्याने या रस्त्यांना राज्य शासनाच्या स्टेट बजेट मधील निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सदर रस्ते दर्जोन्नतीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले आहेत.
तसेच लवकरच या रस्त्यांना विविध रस्ते विकास योजनांच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येईल असेही आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सांगितले.

प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत झालेल्या रस्त्यांची नावे –

१) – प्रजिमा ४० ते वलठाण फाटा -३२ नं. तांडा – शामवाडी- चितेगांव – निमखेडी – हिरापुर – अंधारी – तमगव्हाण रस्ता. (१३ किमी) नवीन प्रजिमा १४२

२) – अंधारी – शेवरी – ब्राह्यणशेवगे – देवळी – भोरस – करगांव – तरवाडे – रहीपुरी रस्ता. (२२.५ किमी) नवीन प्रजिमा १४३

३) – राज्यमार्ग-२११ ते मेहुणबारे – शिदवाडी – दस्केबडी – जामदा – रहीपुरी – बोरखेडा बु. – ढोमणे फाटा – वडाळा – हिंगोणे सिम राष्ट्रीय महामार्ग ७५३ ला मिळणारा रस्ता. (११.५ किमी) नवीन प्रजिमा १४४

४) – राज्यमार्ग-२४ ते जामडी – चांभार्डी बु. – मुंदखेडा – पांतोडा – वाघळी स्टे – न्हावे – बोरखेडा – बहाळ खेडगांव – गुढे ते जिल्हा हद्द रस्ता, (१६.२ किमी) नवीन प्रजिमा १४५

५) – रामा-१९ – रामनगर – लोंढे – कृष्णापुरी – वरखेडे खु. – पिंपळवाड म्हा. – टाकळी प्र.दे. – देशमुखवाडी – अलवाडी – सायगांव – नांद्रे – काकडणे – माळशेवगा – शेवरी – हिरापुर रस्ता. (२६ किमी) नवीन प्रजिमा १४६

६) – मेहुणबारे – शिदवाडी – पोहरे – अभोणे – कळमडू – जिल्हा हद्द रस्ता. (१०.२ किमी) नवीन प्रजिमा १४७

७) – चाळीसगांव – कोदगांव – बेलदारवाडी – गणपुर तांडा – पिंपरखेड गांव – सांगवी रस्ता. (१९.५ किमी)
नवीन प्रजिमा १४८

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: