आमदार चव्हाण यांच्या वाढदिवसाला जत्रेचे स्वरूप,बालगोपालांपासून ते वयोवृद्धांची हजेरी,तालुकवासीयांच्या प्रेमाचे दर्शन…

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)

चाळीसगांव(प्रतिनिधी)- आपल्या चाळीसगाव तालुक्याचे वैभव म्हणजे ” आदिशक्ती ” पाटणा निवासिनी चण्डिकादेवी मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे या दि २३ ऑगस्ट रोजी या वाढदिवसाला सुद्धा आमदार मंगेश चव्हाण यांनी सपत्नीक मातेचे दर्शन घेतले व चाळीसगाव वासीयांच्या सुख समृध्दी व भरभराटीसाठी प्रार्थना केली .यावेळी पाटणा पंचक्रोशीतील आजी माजी लोकप्रतिनिधी , भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी – कार्यकर्ते,आमदार चव्हाण यांच्यावर प्रेम करणारे मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते . याठिकाणी असणाऱ्या डोंगरी नदीवरील लोखंडी पूल काढण्यात आल्याने भाविकांना होणारा त्रास लक्षात घेता आमदार निधीमार्फ़त २५ लाख रुपये खर्चातून सदर जागेवर लोखंडी पूल उभारण्यात येणार असून लवकरच सर्व परवानग्या प्राप्त झाल्यानंतर तात्काळ याठिकाणी लोखंडी व मजबूत असा पूल उभा राहील असे आमदार चव्हाण यांनी सांगितले यावेळी पाटणादेवी येथील दुकानदार व ग्रामस्थ यांनी आमदार यांचे अभिष्टचिंतन केले, आमदार चव्हाण यांनी या नंतर आपल्या गावी हिंगोने येथे जाऊन कुलदैवत शाकंभरी मातेचे दर्शन घेतले व सुरवात झाली वाढदिवसाची वारकरी शिक्षण संस्थेचे विध्यार्थी यांनी शुभेच्छा देत आमदार यांच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला म बहिणी तरी कश्या मागे राहणार वाघळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आशा सेविका यांनी देखील आमदारांना शुभेच्छा दिल्या व आईचा आशीर्वाद तर मिळालाच होता मात्र हिंगोने गावातील आई समान असलेल्या आई माउलींनी सुद्धा पुढे येत आशीर्वाद रुपी शुभेच्छा दिल्या दिवसभर सुरू असलेल्या वाढदिवसाच्या आनंदाला संध्याकाळी आमदार चव्हाण यांच्या घरी जत्रेचे स्वरूप आले होते आमदार चव्हाण यांच्यावर प्रेम करणारे जनसामान्यांपासून ते नामांकित मंडळी यांची गर्दी पाहायला मिळाली आमदार चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मात्र एक गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे आमदार यांचा रूप पाण्यासारखे असून या मुळे ते प्रत्येक रंगात रंगून जातात म्हणूनच वाढदिवस इतका रंगतदार झाला प्रत्येक घटक आमदार चव्हाण यांचा चाहता होत चालला आहे,वाढदिवसाला झालेली गर्दी म्हणजे आमदार चव्हाण यांच्या कार्याची पावती आहे,वाढदिवसाला येणाऱ्या प्रत्येकाच्या शुभेच्छांचा आमदार चव्हाण यांनी मनापासून स्वीकार केला.