दौंड(पवन साळवे) कोरोना COVID-19 चा वाढता प्रभाव पाहता सर्व सरकारी यंत्रणा असो वा खाजगी यंत्रणा जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहे कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहे.त्याच अनुषंगाने दौंड शहर पोलिस सर्वोतोपरी प्रयत्नही करत आहे दौंड शहरात येणाऱ्या वाहनांवर काटेकोरपणे निरीक्षण करण्यात येत प्रत्येक गाड्यांची तपासणी योग्यप्रकारे करत आहेत.असाच एक प्रकार दौंड मध्ये घडला आहे.दौंडमध्ये एक फॅमिली पेशंट खोपोली सातगाव येथून डिलिव्हरी साठी दौंड येथे आले आहे असे समजताच दौंड पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस पो हवा थोरात, पो हवा रोटे, पो हवा भगत,यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्या परिवाराला उपजिल्हारुग्णालय येथे दाखल केले व तेथे चेकअप करून त्यांना त्यांच्या दौंड येथील निवस्थानी सोडण्यात आले.
