जळगाव(प्रतिनिधी)-दिनांक 22 – कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेले चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील जवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांची आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट घेऊन सात्वंन करुन शोक व्यक्त केला.
जम्मूमधील पूंछ भागात कर्तव्य बजावत असताना वाकडी गावचे सुपुत्र, सीमा सुरक्षा दलातील जवान अमित पाटील यांना 16 डिसेंबर रोजी वीरगती प्राप्त झाली होती. आज पालकमंत्री ना. पाटील यांनी वीरजवान अमित पाटील यांच्या मुळगावी वाकडी येथील घरी जाऊन त्यांचे वडिल साहेबराव पाटील, आई सकुबाई पाटील, पत्नी वैशालीताई पाटील यांची भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले.
वीरजवान अमित पाटील यांना भारतमातेची सेवा करीत असताना वीरगती प्राप्त झाली आहे. त्यांनी देशाच्या सेवेसाठी दिलेले बलीदान व्यर्थ जाणार नाही अशा भावना व्यक्त करुन पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, वीरजवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल.
यावेळी पालकमंत्र्यासमवेत उपस्थित होते.
शिवसेनेचे उपजिल्हा संघटक महेंद्र पाटील, तालुका प्रमुख रमेश पाटील, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, शहर प्रमुख नानभाऊ कुमावत, सुनील गायकवाड, नकुल पाटील, मोती आप्पा पाटील, निलेश गायके व वसीम चेअरमन आदी उपस्थित होते.