अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)केडगाव चौफुला जवळील वाखारी ता.दौंड जि.पुणे येथे मारहाण करून लुटमार करणाऱ्या दोन सराईत अट्टल चोरट्यांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने जेरबंद केल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
दिनांक ११ मार्च २०२१ रोजी दुपारी १४.३० वा.चे सुमारास केडगाव चौफुला जवळील मौजे वाखारी ता.दौंड गांवचे हददीत कॅनॉलचे कच्चे रोडचे कडेला इसम नामे सागर उर्फ सोन्या सुर्यवंशी व एक अनोळखी इसम यांनी फिर्यादी रमेश शामजी कुछाडीया वय ३६ वर्षे रा.कोपरखैरणे, नवी मुंबई यांचे गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची चैन, उजवे मनगटावरील दोन तोळा वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, दोन सोन्याच्या अंगठया, एक मोबाईल, रोख रक्कम १५ हजार रुपये असा एकुण किं.रु. १,४५,०००/- चा माल जबरदस्तीने काढून चोरून नेला. त्यावेळी फिर्यादी यांनी आरडाओरड केला असता तेथे रस्त्याने जाणारे लोक आल्याने दोघे आरोपी पळून गेले होते. सदर घडले प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवत पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाच्या असल्याने गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक पुणे-सोलापूर रोड कुरकुंभ परिसरात करीत असताना त्यांना गोपनीय खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम हे पाटस, बारामती फाटा ता.दौड जि.पुणे येथे त्यांच्याकडील सोन्याच्या अंगठ्या विकण्यासाठी येणार आहेत. अशी बातमी मिळालने लागलीच पोलीसांनी वेशांतर करून त्या ठिकाणी सापळा रचून सोन्याच्या अंगठ्या विकण्यासाठी मोटरसायकलवर येवून उभ्या असलेल्या १)सागर उर्फ सोन्या जालिंधर सुर्यवंशी वय २९ वर्षे रा.केडगाव पिसेवस्ती ता.दौंड जि.पुणे. २)अमोल उर्फ लखन विलास देशमुख वय २९ वर्षे रा.खंडोबानगर ता.बारामती जि.पुणे या दोघे संशयितांना हेरले. आरोपी हे पूर्वीचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांना पाहून ते पळून जात असताना पोलिसांनी त्यांच्याकडील वाहन त्यांच्या मोटारसायकलला आडवे लावून त्यांना मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांचेकडे वाखारी येथील जबरी चोरीचे गुन्हयातील त्यांनी चोरलेल्या २ सोन्याच्या अंगठया, १ मोबाईल, रोख रक्कम रू.७,०००/- तसेच गुन्हयात वापरलेली मोटरसायकल व इतर १ मोबाइल असा एकूण १,०२,०००/- (एक लाख दोन हजार) चा ऐवज मिळून आलेने तो जप्त केलेला आहे. प्राथमिक चौकशी मध्ये दोघे आरोपींनी सदरचा ऐवज वाखरी येथे एका इसमास मारहाण करून जबरदस्तीने लुटल्याचे सांगितले.
दोघे आरोपी हे यापूर्वीचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. आरोपींनी यापूर्वी केडगाव चौफुला, पाटस, कुरकुंभ, सोलापूर रोड येथे वाहनचालक व प्रवासी यांची लुटमार केल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास चालू असून आरोपींकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर परिसरात अशा प्रकारे कोणाची जबरदस्तीने लूटमार झाली असल्यास यवत पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी केले आहे. आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल व दोघे आरोपी यांना पुढील कारवाईसाठी यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे. पुढील अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली
सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड यांनी केलेली आहे.
दोन्ही आरोपी हे यापूर्वीचे रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असून आरोपी सागर उर्फ सोन्या जालिंधर सुर्यवंशी याचेवर यापूर्वी यवत व भिगवण पोलीस स्टेशनला ३ जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी अमोल उर्फ लखन विलास देशमुख याचेवर यापूर्वी पुणे, सोलापूर व सातारा जिल्हयात जबरी चोरी , खंडणी, पळवून नेणे, दुखापत, चोऱ्या असे एकूण २२ गुन्हे दाखल आहेत.