अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
अधिकार आमचा विशेष-वाढती कोरोना रुग्णांची संख्या व टप्प्याटप्प्यात होणारे लॉकडाऊन संपूर्ण जळगाव जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन केले जात आहेत,प्रशासन कोरोना सोबत लढण्यास पूर्ण तयारीत आपली संपूर्ण शक्ती लावून रोखण्यासाठी प्रयत्न करत असून मात्र कोरोना रुग्णांची संख्या थांबायला तयार नाही याची जबादारी कोणाची प्रशासनाची की जनतेची जबाबदारी प्रशासन व जनता दोघांच्या खांद्यावर असून ती पेलण्यासाठी फक्त एक काम सर्वांना मिळून करायचे आहे ते म्हणजे स्वयंशिस्त हो फक्त आणि फक्त आम्ही स्वतःला शिस्त लावणे गरजेचे आहे.
लॉकडाऊन केल्यावर लोकं जरी शांत होत असले तरी लॉकडाऊन उघडल्यावर एकच गर्दी करतांना दिसतात वारंवार बंद मुळे छोट्या छोट्या व्यवसाहिकांवर उपासमारीची वेळ आली आहे आम्हला कोरोनाच्या जाळ्यातून मुक्त होण्यासाठी फक्त आणि फक्त शिस्त लावायची आहे स्वतःला शासन नियमांचे पालन करण्याची काय नियम तर मास्क वापरणे,सुरक्षित अंतर,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा,बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवा या छोट्या गोष्टी शिस्तीने केल्या तर नक्कीच लॉकडाऊन लागणार नाही आणि जे लोक शिस्त पाळत नाही त्यांना प्रशासनाने दंड व आपल्या शक्तीचा वापर करून शिस्त लावावी जेणे करून सर्व व्यवहार पूर्व पदावर यायला वेळ लागणार नाही.वेळ आहे विचार करण्याची नाही तर कोणी विचारणार नाही.