अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-जळगाव जिल्ह्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना व अधिकारी यांना कोरोनाची लस उपलब्ध करून देण्याची मागणी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पत्राद्वारे केली आहे
कोरोना काळात एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा दिली सेवा देत असतांना कर्मचारी पॉजिटीव्ह आलेत तर कित्येक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तरी या कठीण काळात सेवा देत असून ज्या प्रमाणे वैद्यकीय क्षेत्र,पोलीस प्रशासन व ज्येष्ठ नागरिकांना लस उपलब्ध करून दिली आहे त्याच प्रमाणे एस टी महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांना तातडीने लस उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे खासदार उन्मेष पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.