अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगांव(प्रतिनिधी)-कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्यांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.अनेकांचे रोजगार बुडाले आहे. नोकर्या गेल्या आहेत.केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देशात कोरोना बरोबर देशवासियांना महागाईचा सामना करावा लागत आहे.पेट्रोल डिझेल,घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले आहे त्यामुळे सर्वच जीवनावश्क वस्तुचे दर सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर गेले आहे.खनिज तेला बरोबर खाद्य तेलाचे भाव ही प्रचंड वाढले आहे.देशातील सर्वसामन्य नागरिकांना जीवन जगणे देखील असहाय्य झाले आहे.तरी केंद्र सरकारने खनिज तेल व खाद्य तेलाचे भाव कमी करणे गरजेचे असतांना देखील केंद्र सरकार कोणतेही उपाययोजना आखत नसल्यामुळे सामान्य उत्पन्न असलेली कुटुंबे बेजार झाली आहे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे त्यामुळे केद्र सरकारने महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी जनआंदोलन खान्देश विभागच्या वतीने केली आहे.
निवेदनावर प्रा गौतम निकम,शत्रुघ्न नेतकर,विजय शर्मा ,योगेश्वर राठोड,आबा गुजर बोरसे,नाशीर शेख,मिलिंद अशोक भालेराव,गणेश भोई, प्रदीप चौधरी,अशोक राठोड,भावराव गांगुर्डे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.