अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य आखिल भारतीय ओ बी सी सेवा संघ दौंड शहर अध्यक्ष पदी रविंद्र हरिदास बंड यांची कायदेशीर निवड करण्यात आली. प्रा.श्री नानासाहेब टेंगले अध्यक्ष पुणे जिल्हा ग्रामीण अ. भा. ओ बी सी सेवा संघ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
संघटनेने दिलेली जबाबदारी सांभाळत तळागाळातील घटका पर्यंत संघटनेचे कार्य पोहचवून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार असून विश्वासला तडा जाऊ देणार नाही यावेळी बंड बोलत होते
बंड हे दौंड शहर नाभिक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.या वेळी जिल्हा संघटक संतोष राऊत तालुका संपर्क प्रमुख योगेश थोरात तसेच हिरामण कुगावकर,संदीप बंड, दिपक सोनवणे,उपस्थित होते.निवडीनंतर बंड यांचे सर्व स्थरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे