अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
अधिकार आमचा विशेष(चाळीसगांव)-एकीकडे पावसाने हैराण झालेले चाळीसगांववासी तर एकी कडे कंबर मोडणारे रस्ते नागरिकांची अवस्था बिकट होत चालली होती मात्र या त्रासातून त्वरित मुक्त करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने स्टेशन रोड बँक ऑफ बडोदा जवळील रस्ता दुरुस्ती चे कार्य सुरू केले आहे.
सोशल मीडियावर वारंवार जागृत नागरिक या रस्त्याबद्दल तक्रार करत होते,लोकांना रस्त्यावरून वाहन चालवितांना कसरत करावी लागत होती शहरातील नागरिकांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी असणारा मार्ग नेहमी येथे छोटे मोठे अपघात सुरू होते मात्र याकडे कोणाचे लक्ष नाही असे चित्र निर्माण झाले होते मात्र आमदार चव्हाण यांचे कार्य पर्यायी नाही तर,कायमस्वरूपी उपाययोजना”काम बोलता है”या प्रमाणे लेट केले पण थेट करणार असे या रस्त्याचे कायमस्वरूपी काम करण्याचे ठरवत आमदार साहेबांनी “आपली माणसे आपले कार्य” या प्रमाणे आपल्या तालुक्यातील लोकांना त्रास नको या हेतूने व भविष्यात कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी आपले आमदार म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी कोणत्याही निधीची वाट न पाहत स्वखर्चाने स्टेशन रोड बँक ऑफ बडोदा जवळील रस्ता दुरुस्ती चे कार्य करण्यास सुरुवात केली आणि 2 दिवसात काम पूर्ण करणार असल्याचे सांगितले आणि पुन्हा आपल्या वैशिष्ट्य पूर्ण कार्याची झलक देत संकट समयी सोबत असल्याचे दाखवून दिले आमदार चव्हाण यांनी सुरू केलेल्या कामाने सर्व सामन्यांना दिलासा मिळाला असून सर्व स्थरातून आमदारांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
चाळीसगाव शहरातील स्टेशन रोड दोन दिवसांसाठी बंद…
बँक ऑफ बडोदा समोरील गटार व त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात तुंबलेल्या पाण्यामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत, आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी स्वखर्चाने सदर रस्त्याचे दुरुस्ती काम सुरू केले असून पुढील दोन दिवस दि.३ व ४ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राधास्वामी मार्केट, गणेश क्रॉस रोड पर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला असून वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवहान आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.