अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-लाकडाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर वनविभागाने कारवाई केली कारवाई पत्रकार महेंद्र सूर्यवंशी यांनी केल्याच्या संशयाने लाकूड माफियांची पुष्पा स्टाईल ने पत्रकार महेंद्र सूर्यवंशी यांना जीवे मारण्याची धमकी,शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पत्रकार महेंद्र तुकाराम सूर्यवंशी यांना रतन वडर (रा. वाघळी )व गणेश पंडित महाजन (रा. टाकळी प्र.चा) या दोघांनी दिनांक ३१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता शहरातील खरजई नाक्यावर अडवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून पत्रकार महेंद्र तुकाराम सूर्यवंशी सह शहरातील पत्रकार बांधवांनी वरील दोघांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ३१ जानेवारीला वनविभागाने लाकडाने भरलेला एक ट्रक पकडला होता ,त्यावर कारवाईदेखील करण्यात आली मात्र हा ट्रक तू फोन केल्याने पकडण्यात आला, असा आरोप वरील दोघांनी महेंद्र सूर्यवंशी यांच्यावर केला. आणि त्यांना मोबाईलवर देखील शिवीगाळ करत दमबाजी करून खरजई नाक्यावर येण्यास सांगितले या ठिकाणी ते आल्यानंतर समजूत काढण्या ऐवजी त्यांनी तुला ट्रॅक्टर खाली घेऊन ठार मारू तुझ्या प्रेताचा देखील तपास लागू देणार नाही. अशी धमकी दिली म्हणून पत्रकार संरक्षण कायद्याच्या योग्य त्या कलमान्वये वरील दोघांवर कारवाई करावी अशी मागणी महेंद्र सूर्यवंशी व शहरातील पत्रकार बांधवांनी लेखी तक्रार देऊन पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांच्याकडे केली होती, सदर मागणी (अर्जानुसार) तक्रारीनुसार वरील दोघांवर आयपीसी ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात सखोल चौकशी करत आरोपींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी असे जिल्ह्यातील सर्वच पत्रकार संघटने तर्फे व सर्वच पत्रकार बांधवांतर्फे मागणी करण्यात येत आहे.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभास जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्यास पोलीस प्रशासन पुढील कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे…!