अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगांव(प्रतिनिधी)- शहर महिला काॅग्रेंस व गोदावरी फाऊंडेशनचे च्या वतीने तथा महाराष्ट्र काॅग्रेस प्रदेशचे उपाध्यक्ष मा.डाॅ.उल्हासदादा पाटील, मा.बाळासाहेब पवार जळगांव काॅग्रेस जिल्हाअध्यक्ष, सौ.सुलोचनाताई वाघ जळगाव महिला काॅग्रेस जिल्हाअध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व डाॅ.केतकीताई पाटील, डाॅ.वैभव पाटील यांच्या उपस्थितीत दि.१९ जानेवारी २०२२ रोजी श्री.रविंद्र पोळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपन्न झालेल्या आरोग्य तपासणीतील गरजु गरीब रूग्णांना पुढिल वैद्यकीय उपचारार्थ ( शस्ञक्रियेसाठी ) ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी गोदावरी फाऊंडेशन च्या वतीने जळगांव येथे घेऊन जाण्यासाठी मोफत वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती
याप्रसंगी विविध आजारांवरील उपचार / शस्ञक्रिया करण्यासाठी एकूण ६० रूग्णांना गोदावरी फाऊंडेशन जळगांव येथे हलविण्यात आलेले असून संबंधित रूग्णांवर पुढिल शक्य ते सर्व ऊपचार मोफत करण्यात येणार आहेत. संबंधित रूग्णवाहीकेस चाळीसगांव शहर महीला काॅंग्रेसच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई पोळ यांनी हिरवा झेंडा दाखवून रूग्णवाहीका . जळगांवकडे रवाना केली
याप्रसंगी मा.माजी आमदार ईश्वर जाधव, अशोक खलाणे, रमेश शिंपी, शिवलाल साबणे, रविभाऊ पोळ, आर.डी चौधरी, अमोल राऊळ,रविंद्र पाटील सर, निलेश भडक, संतोषपोळ,देविदास खरटमल,मधु गवळी, सुनिल मोची, नितीन पवार, मंगेश बागुल, छोटू गवळी, बाळासाहेब पोळ,नयन खरटमल,राहूल खरटमल, विकी खरटमल,आतिष खरटमल, निळकंठ साबणे, शेख गयासबाबा, ऍड संदीपभाऊ सोनार, अरूण साबणे,कुसुमबाई खरटमल, छाया खरटमल, लताबाई पगारे, निता खरटमल, मंगल खरटमल, संगिता खरटमल,सुमन नंगवारे, कल्पना मोची, तुळसाबाई मोहरकर ,आणि इतर मान्यवार उपस्थित होते.