अधिकार आमचा न्युज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
पुणे(वृत्तसेवा)-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग तथा प्रभारी शिक्षणाधिकारी प्राथमिक कमलाकर रणदिवे सहाय्यक प्रशासन अधिकारी शेखर गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले .पुणे महानगर पालिकेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांप्रमाणे नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आधिकारी यांना शहरी २७ % घरभाडे भत्ता लागू करण्यात यावा असे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाने मागणी केली आहे
दिनांक १० फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांची भेट घेऊन चर्चा केली .शासन निर्णयानुसार व सातवा वेतन आयोगाप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेतील नव्याने समाविष्ट २३ गावे व पुर्वीच्या ११ गावे अशा एकूण ३४ गावातील शाळा महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झाल्याने या सर्व समाविष्ट क्षेत्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना शहरी भागातील वर्गीकरणानुसार( एक्स, वाय )दर्जा प्रमाणे २७ % घरभाडेवाढ त्वरित लागू करण्यात यावी या बाबतीत निवेदन देण्यात आले. जिल्हा परिषद प्रशासन सदर भाडेवाढीबाबत सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघास दिले . तसेच याबरोबरच प्रलंबित मुख्याध्यापक पदोन्नती देखील ग्रामविकास मंत्रालयाकडून मार्गदर्शन घेऊन लवकरच करण्यात येईल, याबरोबरच प्रलंबित वैद्यकीय बिले , भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव मंजुरी , वरीष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव, निवडश्रेणी प्रस्ताव याबाबत सविस्तर चर्चा झाली व प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. यापुर्वी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या विनंती प्रमाणे रजा मंजूरी, वैद्यकीय बिले हे पुन्हा पंचायत समिती गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना पुर्वी प्रमाणेच अधिकार देण्यात आले आहेत असे सांगितले,विविध शिक्षक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली सोबत राज्याध्यक्ष गौतम कांबळे राज्य महासचिव विठ्ठल सावंत, राज्य सल्लागार तैमुर शेख , पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद चव्हाण व इतर शिष्टमंडळातील पदाधिकारी उपस्थित होते.