अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव(प्रतिनिधी)-चाळीसगाव धुळे पॅसेंजरने प्रवास करण्यासाठी आनंदाची बातमी आता चाळीसगाव धुळे पॅसेंजर 11 एप्रिल पासून दिवसातून चार वेळा धावणार चाळीसगांव ते धुळे.
चाळीसगांव वरून धुळे जाण्याची वेळ
सकाळी 6 वाजून 30 मिनिट
सकाळी 9 वाजून 50 मिनिट
दुपारी 12 वाजून 55 मिनिट
संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिट
यापूर्वी चाळीसगांव ते धुळे रेल्वे पॅसेंजर फक्त दोनच फेऱ्या होत होत्या प्रवाशांना होणारी गैरसोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने अधिकृत परिपत्रक जारी करत प्रवाशांना आनंदाची बातमी दिली आहे,की पूर्वी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी व संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी चाळीसगाव येथून धुळे साठी चाळीसगाव धुळे पॅसेंजर रवाना होत होती,मात्र प्रवाशी हितांना लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने पुन्हा दोन फेऱ्या वाढवले आहेत म्हणजेच पूर्वीच्या दोन आणि आता दोन अश्या मिळून चार फेऱ्या चाळीसगांव ते धुळे पॅसेंजर ने होणार आहे, नवीन फेऱ्यांची वेळ सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी दुपारी 12 वाजून 55 मिनिटांनी चाळीसगावहुन धुळे प्रवाशी घेऊन निघणार आहे