अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
नाशिक(वृत्तसेवा)-आज दि 3 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास देवळाली लहवीत दरम्यान पवन एक्सप्रेस चे 4 डबे रुळावरून घसरले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार देवळाली लहवीत दरम्यान पवन एक्सप्रेस चे चार डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला असून इगतपुरी-डाऊन मार्गावर हा अपघात झाला आहे. काही प्रवासी जखमी झाल्याचे कळते,अपघातग्रस्तांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत,रेल्वे डबे रुळावरून घसरल्याचे कळताच स्थानिकांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले आहे, घटनास्थळी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून मदतकार्य सुरू केले असून अपघात निवारण गाडी तसेच मेडिकल व्हॅन दाखल झाली आहे,अपघातामुळे प्रवाश्यांचे हाल झाले असून रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.