अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख एकाहत्तर हजार तीनशे पन्नास रूपयाचा माल जप्त
मिळालेल्या माहितीनुसार सोलापुर पुणे हायवे रोडवर मौजे पाटस ता.दौंड, जि पुणे गावाच्या हददीत पाटस टोलनाका येथे हातभटटी गावठी दारू वाहतुक करणाऱ्यास जेरबंद करण्यात आले.
त्याचेकडुन वाहनासह सुमारे 4 लाख 71 हजार 350 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक श्री नारायण पवार यांनी सांगितलं.
पोलीस हवालदार निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड,
अक्षय यादव, रामदास जगताप, प्रविण चौधर यांचे पथक यवत पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार गुरूनाथ गायकवाड यांना माहिती मिळाली की सोलापुर बाजुकडुन पुणे बाजुकडे मारुती स्विफ्ट कंपनी ची कार एम.एच.12 ए टी .7894 मधून एक इसम गावठी हातभट्टीची गावठी तयार दारू वाहतुक करीत असलेबाबत माहिती मिळाताच वरील पोलीस स्टाप व
पाटस पोलीस दुरक्षेत्र येथील सहा.फौजदार सांगर चव्हाण, पो.हवा. संजय देवकाते यानी पाटस
टोलनाका येथे नाकाबंदी करीत मिळालेल्या माहिती प्रमाणे मारूती स्विफ्ट कार नं, एम.एच.12
ए.टी.7894 ही येतांना दिसली असता वरील पोलीस स्टाप ने बेरीकेट लावुन सदर वाहन व त्यावरील चालक नामे अमिन धुल्ला गुडदावत वय २४ वर्षे, रा.शेलारवाडी, गाडामोडी, ता.दौड, जि.पुणे यास ताब्यात घेवुन गाडीची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये ७ गावठी हातभट्टीने तयार दारूचे गॅलन असा गाडीसह किमत रूपये 4 लाख 71 हजार 350 रू चा मुद्देमाल जप्त करणेत आला असुन आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस, दौड विभाग दौड,श्री.नारायण पवार पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन, यांचे मार्गदशनाखाली सहा.फौजदार सागर चव्हाण, पो हवा.संजय देवकाते, निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, रामदास जगताप, प्रविण चौधर यांनी केली आहे.