अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव(प्रतिनिधी)-तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव आणि तालुका वकील संघ चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने ‘जागतिक योग दिवस’ निमित्त कार्यक्रमाचे आयोजन संपन्न
माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशनाप्रमाणे दि. २१ जून २०२२ रोजी ‘जागतिक योग दिवस’ निमित्त तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव, वकील संघ चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने मा.अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांचे अध्यक्षतेखाली शिबीर घेण्यात आले. सदर शिबीरात प्रमुख अतिथी योगाचार्य श्री. बाबासाहेब वसंतराव साेनू चंद्रात्रे यांनी व्याख्यानाद्वारे शिबीरात मार्गदर्शन केले. तसेच अतिथी सौ. वंदना साठे यांनी योगाचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांनी आपले अध्यक्षीय भाषण व ‘जागतिक योग दिवस’ या विषयावर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करुन दाखविले. सदर कार्यक्रमास सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर आणि न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चाळीसगाव श्री.एस.डी.यादव, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर आणि न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चाळीसगाव श्री. ए.एच.शेख, अॅड.श्री.मयुर लक्ष्मण कुमावत, सहसचिव तालुका वकील संघ चाळीसगाव, अॅड.वर्षा एकनाथ देवरे, खजिनदार तालुका वकील संघ चाळीसगाव तसेच वकील संघातील सदस्य अॅड.श्री. भुषण एडके, अॅड.श्री.संतोष पाटील, न्यायालयीन कर्मचारी श्री.सी.के.बोरसे, श्री.एस.आर.पवार, श्री.एन.आर.पिंपळे, श्री. डी.डी.दाभाडे, श्री. आर.एन.चव्हाण, श्री. जी.ए.राठोड, श्री.व्ही.डी.बच्छाव, श्रीमती किरण जावळे तसेच विधीसेवा समिती तर्फे कार्यक्रमाचे आयोजन श्री.डी.के.पवार, व.लिपीक, श्री. डी. टी. कु-हाडे, श्री. किशोर पाटील यांनी पाहिले. अॅड.श्री.बी.के.पाटील, अध्यक्ष तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी सर्व प्रमुख अतिथी, मान्यवर व उपस्थितांचे आभार व्यक्त केेले व कार्यक्रमाची सांगता केली.