अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-गोपाळवाडी येथे झालेल्या रक्तदान शिबीरात तीन महिलांसह 153 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे,ग्रामपंचायत सदस्य रोहन गारुडी या तरुणाच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला,रक्तदान शिबिराचे उद्घाटन दौंड चे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते झाले, यावेळी पो नि विनोद घुगे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले, पुढे बोलताना ते म्हणाले तरुणांनी व्यसनाच्या व गुन्हेगारी प्रवृत्ती कडे न जाता शारीरिक दृष्ट्या सक्षम बनून,शिक्षणावर भर द्यावा तहसीलदार, कलेकटर, पोलीस अधिकारी बना आणि आपल्या आईवडील आणि गावाचे नाव मोठे करा,तुमचे गाव शहराजवळ असूनही तुम्ही गावाचे गावपण टिकवले आहे,तुमच्या गावातून एकही तक्रार दाखल होत नाही,ही अभिमानाची बाब आहे,नाहीतर वाढदिवस शक्यतो दारू पार्टी करून होतात,त्यापेक्षा असे वाढदिवस साजरे करून तुम्ही एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे,या शिबिराची उल्लेखनीय बाब तीन महिलांनी रक्तदान करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे, संघर्ष सायकलिंग ग्रुप च्या ऍड कावेरी पवार,शिक्षिका निलम शिंदे आणि नंदिनी डोंगरे या तीन महिलांनी रक्तदान केले,त्यांचा प्रमाणपत्र आणि गुलाबाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला,या शिबिरात 50 तरुणानी पहिल्यांदा रक्तदान केले,एकूण 153 रक्तदात्यांनी रक्तदान केले,त्यांना चिंच,जांभूळ, करंजी गुलाब मोगराची रोपे देऊन सत्कार करण्यात आला, जिजामाता हायस्कूल येथील 10 वि मध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विध्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले,रोहन रविंद्र आटोळे,सुयश सॅमसन साळवी,आणि राजश्री सुभाष होले यांचा सत्कार करण्यात आला, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते केक कापून रोहनचा वाढदिवस साजरा करण्यात आला,अंगणवाडी, प्राथमिक शाळा येथे खाऊ वाटप करण्यात आले,यावेळी जेष्ठ नेते माजी उपसभापती बबनराव लव्हे,माजी सरपंच अशोक सूळ,माजी सरपंच विलास डोंगरे,सरपंच लक्ष्मीताई होले,पोलीस पाटील वर्षाताई लोणकर, उपसरपंच जयसिंग दरेकर, माजी उपसरपंच नारायण सूळ,महाराष्ट्र बँक मॅनेजर राजविर सिंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते, सूत्रसंचालन तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले यांनी केले तर आभार जयसिंग दरेकर यांनी मानले,या कार्यक्रमाला तरुण मोठया संख्येने उपस्थित होते.