अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव(प्रतिनिधी)-आज दिनांक 08 जुलै शुक्रवार रोजी पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे, यांनी चाळीसगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यातील हद्दीतील सर्व खाटीक बांधवांची बैठक घेऊन त्यांना बकरी ईदच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना दिल्या. बकरी ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने सर्व खाटीक बांधवांनी स्वखुशीने सामाजिक सलोखा जपण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांची बकरी ईदची कुर्बानी आषाढी एकादशीच्या दिवशी न देता एकादशी नंतर दुस-या दिवशी देण्याचे ठरविले आहे. त्याबाबत त्यांनी ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे चाळीसगांव ग्रामीण पोस्टे यांना स्वतःहून निवेदन दिले आहे.
सदर बैठकीस ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहा. पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण, धरमसिंग सुंदरडे, इतर पोलीस सहकारी तसेच जावेद शब्बीर शेख रा. पाटणा, दाऊद अकबर पठाण रा. तांबोळा, नुर अली शौकत अली रा. तांबोळा, समशोद्दीन सांडू सैय्यद रा. हिरापुर, वसिम युनूस खाटीक रा.लोंजा, अलिमशाह हबीब शाह रा. लोंजा, राजू इकबालशाह फकीर रा. लोंजा, परवेज गफ्फार खाटीक रा. लोंजा, शेख युनुस शेख ईस्माईल रा. तांबोळा, शब्बीर खाँ समशेर खाँ रा. तांबोळा इत्यादी खाटीक समाजबांधव हजर होते. त्यांनी स्वखुशीने त्यांच्या गावातील मुस्लीम बांधवांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बकरी ईदची कुरबानी देण्याची ईच्छा व्यक्त केल्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले आहे व त्यांच्या निर्णयाबद्दल शुभेच्छा दिल्या.